IPL 2022 : स्पर्धेचे आयोजन दुबईत नाही तर 'इथे'

IPL 2022 : स्पर्धेचे आयोजन दुबईत नाही तर 'इथे'
आयपीएल

मुंबई | Mumbai

भारतात करोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) वेगाने पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज १ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. यामुळे मागील २ वर्षांप्रमाणे आयपीएल १५ चे (IPL 15) आयोजन नेमके कोठे करायचे? असा प्रश्न बीसीसीआयला (BCCI) सतावत आहे...

भारतात करोनाने मागील २ वर्षांपासून हाहाकार माजवल्यामुळे आयपीएल २०२० चा (IPL 2020) संपूर्ण हंगाम आणि २०२१ चा उर्वरीत हंगाम यूएईत (UAE) आयोजित करावा लागला होता. आता बीसीसीआयने आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) हंगामाच्या आयोजनाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयसमोर आयपीएल भारतातच आयोजित करण्याचे २ मार्ग असून यातील पहिला मार्ग म्हणजे १० संघांमध्ये होम अवे फॉरमॅटनुसार सामन्यांचे आयोजन करणे.

दुसरा मार्ग म्हणजे मुंबईतील (Mumbai) वानखेडे क्रिकेट मैदान (Wankhede Stadium), डिवाय पाटील मैदान (D. Y. Patil Stadium), आणि ब्रेबॉर्न क्रिकेट मैदान (bebron stadium) या ३ मैदानांवर सर्व सामन्यांचे आयोजन करणे.

तिसरा आणि अंतिम पर्याय सर्व सामन्यांचे आयोजन यूएईतील दुबई (Dubai), शारजाह (Sharjah) आणि अबुधाबी (Abu dhabi) या ३ मैदानांवर करणे. मात्र सध्यातरी बीसीसीआयचा (BCCI) यूएईत सामन्यांच्या आयोजनावर कोणताही विचार झालेला नाही.

आयपीएल २०२२ स्पर्धा २ एप्रिल ते ५ जूनपर्यंत खेळण्यात येईल, असे बीसीसीआयने सुरुवातीला स्पष्ट केले होते. मात्र आता या कार्यक्रमात काहीसा बदल केला जाण्याची शक्यता आहे. भारतातील करोना रुग्णवाढीचा आलेख पाहता ही तारीख १ आठवड्याने मागे ढकलून स्पर्धा २५ मार्चपासून सुरु होऊ शकते. मात्र भारतातील करोनाची परिस्थिती पाहून या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती मिळत आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com