IPL 2022 : आगामी हंगाम कुठे? जय शाह म्हणाले...

IPL 2022 : आगामी हंगाम कुठे? जय शाह म्हणाले...
आयपीएल

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२२ चा (IPL 2022) नवा हंगाम अवघ्या ५ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. हा स्पर्धेचा १५ वा हंगाम असणार आहे. त्यामुळे आयपीएल (IPL) चाहत्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. कारण यंदाच्या आगामी हंगामात तब्बल १० संघ आपला सहभाग नोंदवणार आहेत...

आयपीएल २०११ मधेही १० संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदाच्या हंगामात १० संघाची विभागणी २ गटात होणार आहे. आणि दोन्ही गटांमधील आघाडीचे २ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. यंदाच्या हंगामात ७४ सामन्यांची मेजवानी आयपीएल चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

आयपीएल २०२० मध्ये भारतात (India) करोना महामारीच्या (Corona) उद्रेकामुळे स्पर्धेचे आयोजन यूएईत (UAE) करण्यात आले होते. तसेच आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईत आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे आगामी हंगामाचे आयोजन भारतात (India ) करण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमात जय शाह यांनी आयपीएलच्या हंगामाची रूपरेषा स्पष्ट केली.

या कार्यक्रमाला बीसीसीआय प्रेसिडेंट सौरव गांगुली, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सीईओ एन श्रीनिवासन उपस्थित होते. आयपीएलमधील सध्याच्या आठ संघांना आपल्या संघातील किमान ४ खेळाडूंना आपल्या संघात कायम राखण्याची संधी असेल. तर नव्या संघाना अधिक सवलत मिळणार आहे. मात्र आयपीएलच्या मेगा लिलावासाठी आयपीएला चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com