जय शहा यांना मिळाले आणखी एक पद; ICC च्या 'या' समितीचे प्रमुख म्हणून निवड

जय शहा यांना मिळाले आणखी एक पद; ICC च्या 'या' समितीचे प्रमुख म्हणून निवड

मुंबई | Mumbai

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल (International Cricket Council) म्हणजेच आयसीसीच्या (ICC) नवीन अध्यक्षाची घोषणा झाली आहे. आयसीसीच्या निवड समिती बोर्डाने सर्वांच्या एकमताने ग्रेग बार्कले यांना आयसीसीच्या अध्यक्षाच्या रूपात दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली आहे.

शनिवारी (दि. 12 नोव्हेंबर) आयसीसीकडून याची घोषणा झाली. आयसीसीच्या बैठकीदरम्यान बार्कले यांच्याव्यतिरिक्त बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांना आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या प्रमुखपदी निवडले आहे.

मेलबर्न येथे आयोजित केल्या गेलेल्या आयसीसीच्या तिमाही बैठकीदरम्यान मतदान झाले. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेत 16 बोर्ड अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता, ज्यात कसोटी सामने खेळणाऱ्या देशांचे पूर्ण 12 सदस्य, 3 सहयोगी देश आणि एक स्वतंत्र महिला संचालकांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com