बीसीसीआयचा 'प्लॅन बी' तयार! यूएई नव्हे तर 'या' दोन देशात होऊ शकते आयपीएल

बीसीसीआयचा 'प्लॅन बी' तयार! यूएई नव्हे तर 'या' दोन देशात होऊ शकते आयपीएल
File Photo

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) मालिका खेळत आहे. हा दौरा आटोपून जेव्हा भारतीय संघ पुन्हा मायदेशी परतेल तेव्हा देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona Third Wave) थैमान सुरु असण्याची शक्यता आहे...

या संपूर्ण परिस्थितीवर बीसीसीआयचे (BCCI) बारीक लक्ष आहे. कारण आयपीएल १५ चा (IPL 15) हंगाम आता तोंडावर आला आहे. सध्या बीसीसीआय 'प्लॅन बी'वर काम करत आहे. २०२१ साली करोनाने आयपीएलच्या बायो बबलमध्ये शिरकाव केल्यामुळे स्पर्धा भारतातून स्थगित करून यूएईत (UAE) खेळवण्यात आली होती.

बीसीसीआयने तयार केलेल्या योजनेनुसार आयपीएल १५ चे आयोजन श्रीलंका (Sri Lanka) किंवा दक्षिण आफ्रिकेत (South Africa) केले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल १५ चा हंगाम खास असणार आहे.

कारण स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे एकूण ७४ सामने खेळवण्यात येणार आहेत. फेब्रुवारीमध्ये आयपीएल १५ चा मेगा लिलाव (Mega Auction) होणार असल्यामुळे सर्व संघांमध्ये अनेक नवीन खेळाडू सहभागी असतील.

भारतात करोनाची परिस्थिती बिघडल्यास आयपीएल आयोजनाची पहिली पसंती दक्षिण आफ्रिकेला असेल. २००९ मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमुळे स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते.

भारत (IND) आणि दक्षिण आफ्रिकेच्या (SA) वेळेत एकूण साडेतीन तासांचा फरक आहे. ही वेळ भारत (India) आणि यूएईपेक्षा (UAE) वेगळी आहे. प्रसारण कर्त्यांनी ७:३० ही वेळ निश्चित केली. तर सर्व सामने ४ वाजता सुरु करावे लागतील.

दक्षिण आफ्रिकेप्रमाणे श्रीलंका स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तयार आहे. शिवाय भारत आणि श्रीलंकेतील अंतर कमी आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आयपीएलच्या आयोजनासाठी सातत्याने बीसीसीआयशी संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com