वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूंना विश्रांती

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूंना विश्रांती

मुंबई l Mumbai

इंग्लडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ आधीच घोषित केला होता. गुरुवारी (१४ जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली.

या मालिकेसाठी भारतीय फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. २९ जुलैपासून त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

केएल राहुल आणि कुलदीप यादव (फिटनेसबाबत अनिश्चितता)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com