ऑॅस्ट्रेलियाच्या क्रिकेटसुंदरीचा होणार घटस्फोट
क्रीडा

ऑॅस्ट्रेलियाच्या क्रिकेटसुंदरीचा होणार घटस्फोट

महिला क्रिकेट खेळाडू एसिल पेरी आणि रग्बी खेळाडू मॅट टूमुआ होणार विभक्त

Ramsing Pardeshi

सिडनी -Sydney

ऑॅस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची खेळाडू एसिल पेरी आणि रग्बी खेळाडू मॅट टूमुआ विभक्त होणार आहेत. ऑॅस्ट्रेलियन माध्यमांच्या वृत्तानुसार, ’’आम्ही या वर्षाच्या सुरुवातीस एकमेकांचा पूर्ण आदर ठेवून विभक्त होण्याचे ठरवले आहे. वेगळे होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि आपले सध्याचे जीवन पाहता ते एकमेकांच्या हिताचे आहे. परस्पर कराराच्या आधारे घेतलेला हा निर्णय आहे‘, असे दोघांनी सांगितले.

पेरी आणि टूमुआ यांनी ऑॅगस्ट २०१४ मध्ये साखरपुडा केला होता. तर, डिसेंबर २०१५ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. फेब्रुवारी महिन्यातील ऑॅस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्कार कार्यक्रमात पेरी जेव्हा लग्नाच्या अंगठीशिवाय दिसली तेव्हा ती आणि टूमुआ यांच्यातील वादाविषयी चर्चा झाली होती. पेरीने तिसर्‍यांदा बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला या जोडीने त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांना नकार दिला असला तरी, बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकल्यानंतर पेरीने आपल्या भाषणात टूमुआचा उल्लेख न केल्याने या दोघांमधील संघर्ष उघडकीस आला होता.

यावर्षी मार्चमध्ये महिला टी-२० वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑॅस्ट्रेलियन संघाची पेरी खेळाडू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com