‘सुवर्ण’ कामगिरीनंतर नीरज चोप्राचा मोठा सन्मान! 'या' तारखेला साजरा केला जाणार 'भालाफेक दिवस'

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा ऐतिहासिक निर्णय
‘सुवर्ण’ कामगिरीनंतर नीरज चोप्राचा मोठा सन्मान! 'या' तारखेला साजरा केला जाणार 'भालाफेक दिवस'

दिल्ली | Delhi

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावून देणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या यशाच्या उंच शिखरावर विराजमान आहे. नीरजने संपादन केलेल्या अभूतपुर्व यशामुळे भारतासाठी ७ ऑगस्ट हा दिवस खरचं ऐतिहासिक ठरला. तब्बल १३ वर्षानंतर ऑलिंम्पिकमध्ये भारतीय तिरंगा उंचावला आणि ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रगीत ऐकू आले. (August 7 as 'Javelin Throw Day' in India)

नीरज चोप्राच्या या अभूतपुर्व यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला अन् बक्षीसांचा पाऊसही पडला. भारत सरकारकडूनही (India Govt) सोमवारी त्याचा सत्कार करण्यात आला. पण, याहीपुढे जात भारतीय अ‍ॅथलेटिक महासंघानं (Athletics Federation of India) नीरजचा (Neeraj) मोठा सन्मान केला आहे.

भारतीय अ‍ॅथलेटिक महासंघानं (AFI) देशात दरवर्षी ७ ऑगस्ट (August 7) रोजी भाला फेक दिवस (Javelin Throw Day) साजरा केला जाईल असे ठरवले आहे. दरवर्षी ७ ऑगस्टला देशभरात भालाफेक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त तरुण या खेळात सामील होतील.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (Athletics Federation of India) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympics 2020) अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रासह (Neeraj Chopra) सर्व खेळाडूंचा सन्मान केला.

डिस्कस थ्रो कमलप्रीत कौर (discus thrower Kamalpreet Kaur), सुवर्णपदक विजेता भारताचा फेकणारा नीरज चोप्रा आणि माजी धावपटू अंजू बाबी जॉर्ज (Anju Bobby George) दिल्ली (Delhi) येथे झालेल्या अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com