अस्मिता दुधारे
अस्मिता दुधारे
क्रीडा

अस्मिता दुधारे हिची कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेवर निवड

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिकमधील तलवारबाजीची शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू अस्मिता दुधारे हिची कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे , कार्याध्यक्ष प्रविण आजबे आणि युवती प्रदेश अध्यक्ष रोशनी जैद यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा निखिल पवार आणि श्रीकांत राजपूत यांनी केली आहे. कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना ही महाराष्ट्र राज्यभर या कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेचे कार्यक्षेत्र असून कृषी क्षेत्रातील पदवीधर युवकांच्या मार्फत महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीसंबधी येणाऱ्या विविध अडचणीचे निराकरण करण्याचे काम या संघटनेच्या मार्फत केले जात आहे.

अस्मिता दुधारे हिने तलवारबाजी या खेळामध्ये १५ वर्षे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेऊन पदकांची कमाई केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने तिला मानाचा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. आपल्या खेळाच्या वाटचाली बरोबरच तिने अभ्यासातही तितकीच मेहनत घेतली आहे. अस्मिताने आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयातून प्रथम वर्गात पदवी संपादन केलेली आहे.

याचबरोबर अस्मिताला समाजकार्याची आवड आहे. क्रीडा क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाकडून प्रेरणा घेऊन विविध क्रीडा आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये तीचाही मोलाचा वाटा राहिलेले आहे.

आपल्या या निवडीबद्दल बोलतांना तिने या संस्थेचे आणि त्यांच्या पदाधीकारी यांचे आभार मानले, आणि माझ्यावर टाकलेल्या या जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या अपेक्षा योग्य प्रकारे पार पडण्याचा माझा प्रयत्न राहील असे सांगितले. या निवडीबद्दल अस्मितांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com