Asian Games 2023 मध्ये भारताने रचला इतिहास, २५ सुवर्णांसह जिंकली १०० पदकं

Asian Games 2023 मध्ये भारताने रचला इतिहास, २५ सुवर्णांसह जिंकली १०० पदकं

दिल्ली | Delhi

भारतीय खेळाडूंनी आशियाई खेळांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या नावावर एकूण १०० पदकं झाली आहेत. तर २५ सुवर्ण पदकांची कमाई भारतीय खेळाडूंनी केली आहे. या अभूतपूर्व यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

शुक्रवारी भारताच्या खात्यात ८६ पदकं होती. काल दिवसभरात हॉकी (सुवर्णपदक), तिरंदादी (रौप्य व कांस्य पदक), ब्रिज (रौप्य), बॅडमिंटन (रौप्य) व रेसलिंग (३ रौप्य) अशा पदकांची लयलूट केली. आज सकाळी भारतीय खेळाडूंनी विजयी कामगिरी करताना तिरंदाजीत तीन, कबड्डीत दोन व बॅडमिंटन आणि पुरुष क्रिकेटमध्ये एक अशा पदकांची निश्चिती केली आहे. त्यामुळे आता भारताची पदकसंख्या शंभरीपार गेली आहे.

पदकतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. भारताने १०० पदके जिंकली आहेत. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. चीनने ३५६ पदके जिंकली आहेत. चीनने १८८ सुवर्ण, १०५ रौप्य आणि ६३ कांस्य पदके जिंकली आहेत. जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपानने ४७ सुवर्णांसह १६९ पदके जिंकली आहेत. कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोरियाने ३६ सुवर्ण, ५० रौप्य आणि ८६ कांस्य पदके जिंकली आहेत. त्यांनी एकूण १७२ पदके जिंकली आहेत.

पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचे अभिनंदन

खेळाडूंनी असामान्य असे यश आशियाई स्पर्धेमध्ये मिळवलं आहे. 100 पदकांच्या विजयामुळे सर्व भारतीय नागरिक रोमांचित झाले आहेत. भारताने इतिहास रचन्यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. खेळाडूंच्या असामान्य खेळीने भारतीयांचे हृदय अभिमानाने भरले आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com