Asian Games : स्क्वॉशमध्ये टीम इंडियाचे ऐतिहासिक यश, पाकिस्तानला हरवून मिळवलं गोल्ड मेडल!

Asian Games : स्क्वॉशमध्ये टीम इंडियाचे ऐतिहासिक यश, पाकिस्तानला हरवून मिळवलं गोल्ड मेडल!

मुंबई | Mumbai

आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज सातवा दिवस आहे. भारताने सात दिवसांत एकूण ३६ पदके जिंकली. भारताला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन आणि सहाव्या दिवशी आठ पदके मिळाली. सातव्या दिवशी भारताला अॅथलेटिक्स आणि नेमबाजीमध्ये पदके मिळू शकतात. आज तीन बॉक्सर प्रीती, लोव्हलिना आणि नरेंद्र यांनी आपली पदके निश्चित केली आहेत. तसेच, भारताच्या पुरुष संघाने स्क्वॉशच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत १०वे सुवर्ण जिंकले.

स्क्वॉशमध्ये भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत हे पदक जिंकले आहे. भारतासाठी, १८ वर्षीय अभय सिंगने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत तणावपूर्ण परिस्थितीत चमकदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील या खेळातील भारतीय संघाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी २०१४ मध्ये भारताने मलेशियाला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. अंतिम फेरीच्या तिसऱ्या सामन्यात अभय सिंगने पाकिस्तानच्या जमान नूरचा ११-७, ९-११, ७-११, ११-९, १२-१० असा पराभव करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. याआधी या सामन्यात सौरव घोषालने महंमद असीम खानचा पराभव केला होता, तर महेश माणगावकरला नासिर इक्बालविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारतीय हेवीवेट स्टार नरेंद्रने इराणच्या इमान रमदानपुरदेलावरचा पराभव करून पुरुषांच्या +९२ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि त्याच्या पदकावर शिक्कामोर्तब केले. +९२ किलो मध्ये फक्त दोन कोटा उपलब्ध आहेत, त्यामुळे २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांचे स्थान बुक करण्यासाठी त्यांना अंतिम फेरी गाठावी लागेल. नरेंद्रच्या आधी प्रीती आणि लव्हलिना यांनी बॉक्सिंगमध्ये पदक मिळवले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com