Asian Games 2023 : चीनमध्ये महाराष्ट्राच्या लेकाचा डंका! मराठमोळ्या अविनाश साबळेची स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी

Asian Games 2023 : चीनमध्ये महाराष्ट्राच्या लेकाचा डंका! मराठमोळ्या अविनाश साबळेची स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी

नवी दिल्ली | New Delhi

चीनमधील (China) हांगझोऊ येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (19th Asian Games) भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करून पदकांची लयलुट करत आहेत. अशातच आता महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने (Avinash Sable) ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत सुवर्णपदकाला (Gold Medal) गवसणी घातली आहे. यासह आशियाई २०२३ क्रीडा स्पर्धेतील स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे...

Asian Games 2023 : चीनमध्ये महाराष्ट्राच्या लेकाचा डंका! मराठमोळ्या अविनाश साबळेची स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी
Raj Thackeray : "आपलं कुठेतरी..."; राज ठाकरेंची सणांमधील डीजेच्या दणदणाटावर पोस्ट

मराठमोळ्या अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये (Steeplechase) सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने ८.१९.५३ मिनिटे पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे (India) हे १२ वे सुवर्णपदक आहे. तसेच सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या ३८ पर्यंत पोहचली आहे. याशिवाय भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला असून यजमान चीन अव्वल स्थानावर आहे. तसेच जपान दुसऱ्या तर रिपब्लिक ऑफ कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर बॅडमिंटनमध्ये भारताची चीनशी स्पर्धा सुरूच आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत आहेत. शेवटचा सामना जिंकणारा संघच सुवर्ण जिंकेल. तर दुसरीकडे अविनाश साबळे याने सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचे (Maharashtra) नाव आज चीनमध्ये गाजवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

दरम्यान, बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आपल्या स्ट्रॅटजीच्या विपरित साबळेने स्वतःमध्ये आणि उर्वरित खेळाडूंमध्ये अंतर निर्माण करण्यासाठी पुढे धाव घेतली आणि मोठ्या अंतराने शर्यत जिंकली. शेवटच्या ५० मीटरमध्ये साबळेने त्याच्या जवळ कोणीही नाही हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले आणि त्याने शेवटची रेषा ओलांडताना आनंद साजरा केला. तसेच २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक (Silver Medal) विजेत्या अविनाश साबळेने ८ मिनिटे ११.२० सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्याच्या हंगामातील सर्वोत्तम वेळ ८.११.६३ इतका आहे.

Asian Games 2023 : चीनमध्ये महाराष्ट्राच्या लेकाचा डंका! मराठमोळ्या अविनाश साबळेची स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी
Viral News : भाजप खासदाराचे महिला आमदाराशी गैरवर्तन? आधी हात पकडला नंतर...; Video व्हायरल

कोण आहे अविनाश साबळे?

काही वर्षांपूर्वीपर्यंत लांब पल्ल्याच्या धावपटूंच्या नावावर भारताचा कोटा रिक्त होता. पण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील (Beed District) मांडवा गावात १३ सप्टेंबर १९९४ रोजी जन्मलेल्या अविनाश साबळे याने ती जागा भरून काढली. अविनाश साबळे हा सर्वसामान्य कुटुंबात वाढला आहे. अविनाशचे आई-वडील शेतकरी आहेत आणि अविनाशला त्याच्या शाळेत ६ किलोमीटर चालत जावे लागत होते. अविनाशने खेळात करिअर करण्याचा कधी विचार केला नव्हता पण आज त्याने स्टीपलचेसमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे.

Asian Games 2023 : चीनमध्ये महाराष्ट्राच्या लेकाचा डंका! मराठमोळ्या अविनाश साबळेची स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंची पदकांची लयलुट सुरुच; नेमबाजीत आणखी एक सुवर्णपदक
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com