
मुंबई | Mumbai
आशिया चषकाच्या (Asia Cup) १५ व्या पर्वाला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेचे सर्व सामने यूएईत (UAE) होणार आहेत. पंरतु मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आजपासून (दि.२०) पात्रता फेरीला (Qualifying Round) सुरुवात होणार आहे...
पात्रता फेरीसाठी मुख्य गटात (Main Group) स्थान मिळविण्यासाठी ४ संघात पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. यामधील एका विजेत्या संघाला इतर ५ संघाशी विजेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे. या ४ संघांमध्ये हाँगकाँग (HongKong) युएई (UAE) सिंगापूर (Singapore) आणि कुवेत (Kuwait) यांचा समावेश आहे.
तसेच यापैकी पात्रता फेरीत बाजी मारणाऱ्या संघाला भारत (India) पाकिस्तान (Pakistan) या गटातील तिसरा संघ बनण्याची संधी मिळेल. तर दुसऱ्या गटात श्रीलंका (SriLanka) अफगाणिस्तान (Afghanistan) बांगलादेश (Bangladesh) या संघाचा समावेश आहे.
असे आहे पात्रता फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक
२० ऑगस्ट - सिंगापूर विरुद्ध हाँगकाँग
२१ ऑगस्ट - कुवेत विरुद्ध यूएई
२२ ऑगस्ट - यूएई विरुद्ध सिंगापूर
२३ ऑगस्ट - हाँगकाँग विरुद्ध कुवेत
२४ ऑगस्ट - कुवेत विरुद्ध सिंगापूर
सलिल परांजपे, नाशिक