
मुंबई | Mumbai
आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) मुख्य फेरीला आजपासून सुरुवात होणार आहे. आशिया चषक स्पर्धेचा श्रीगणेशा श्रीलंका आणि अफगाणिस्तान (Sri Lanka and Afghanistan) यांच्यातील पहिला सामन्याने होणार आहे. हा सामना दुबई (Dubai) येथे खेळविण्यात येणार आहे...
२०१८ नंतर तब्बल ४ वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आशिया चषकाचे आयोजन यंदा यूएईत (UAE) करण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने २० षटकांचे होणार आहेत. तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.२० वाजता सुरु होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात आले आहे.
तसेच आशिया चषकातील पहिल्या सामन्याआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा गोलंदाज दुशमंता चमिराला (Dusmanta Chamira) सरावादरम्यान दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याच्याजागी नुवान तुषारला (Nuwan Thushara) संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच श्रीलंका संघाचे नेतृत्व दासून शनकाकडे (Dasun Shanaka) असून अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व मोहम्मद नबीकडे (Mohammad Nabi) देण्यात आले आहे.
दरम्यान, आशिया चषकाच्या २०१८ मध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी श्रीलंकेला आता संधी मिळाली आहे. तर आजच्या पहिल्या सामन्यात दसून शनका, मोहम्मद नबी, रशीद खान (Rashid Khan)दिनेश चंदिमल (Dinesh Chandimal) हे स्टार प्लेअर्स असणार आहेत.
सलिल परांजपे, नाशिक