Asia Cup 2022 : अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत टिकणार का?

Asia Cup 2022 : अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत टिकणार का?

दुबई | Dubai

आशिया चषक २०२२ मध्ये (Asia Cup 2022) भारतीय संघाने (Team India) आपल्या दोन्ही साखळी सामन्यात पाकिस्तान (Pakistan) आणि हाँगकाँग (Hong Kong) संघांना पराभूत करून यंदाच्या स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली होती...

सुपर ४ मध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघ पाकला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा पाकिस्तान संघावर आपलं वर्चस्व सिद्ध करेल, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र पाकिस्तान संघाने भारताला पराभूत केले. आज सुपर ४ मध्ये श्रीलंका विरुद्ध भारत सामना रंगणार आहे.

भारताला पराभूत करून अंतिम सामन्यात आपलं स्थान जवळपास पक्के करण्यासाठी श्रीलंका प्रयत्न करणार आहे. तर भारतीय संघासाठी हा सामना विजयाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. या सामन्यात भारताने विजय संपादन केल्यास भारताला अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशा जिवंत ठेवण्यास मदत होणार आहे.

Asia Cup 2022 : अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत टिकणार का?
'तो' पुन्हा येणार! 'या' भागात कोसळणार मुसळधार पाऊस

हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

Asia Cup 2022 : अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत टिकणार का?
एका झटक्यात सारं काही हिरावून नेलं, ४० हून अधिक दगावले; 'पाहा' चीनमध्ये काय झाले?

टी २० क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका २५ वेळा समोर आले आहेत. यात भारताने १७ तर श्रीलंकेने ७ विजय संपादन केले आहेत. १ सामना अनिर्णित राहिला आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, कुशल मेंडिस हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com