आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान; कोण कोणावर पडणार भारी?

आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान; कोण कोणावर पडणार भारी?

मुंबई | Mumbai

आज (रविवार) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. सुपर-4 मधील दुसऱ्या सामन्यात या कट्टर प्रतिद्वंद्वी संघांची लढत रंगणार आहे.

आशिया चषक स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. आता आशिया चषक टी-20 स्पर्धेत अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला आजची कठीण परीक्षाही पास करावी लागणार आहे.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (उपकर्णधार), सूर्य कुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

पाकिस्तान संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, हसन अली, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com