Asia Cup 2022 : भारत-हाँगकाँग आज भिडणार

Asia Cup 2022 : भारत-हाँगकाँग आज भिडणार

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय संघाने (Indian Team) आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) धूळ चारल्यानंतर आज दुसरा सामना हाँगकाँगशी (Hong Kong) होणार आहे. हा सामना जिंकल्यास सुपर ४ मध्ये भारताचे स्थान निश्चित होईल...

भारत हाँगकाँगसोबत प्रथमच टी २० सामना खेळणार आहे. तर आशिया चषक स्पर्धेत ५० षटकांच्या सामन्यात दोन्ही वेळा भारताने हाँगकाँगला पराभूत केले आहे. त्यानंतर आता टी २० सामन्यातही प्रतिस्पर्धी संघावर आपले वर्चस्व राखण्यासाठी भारताला संधी मिळणार आहे.

आजच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) जागी रिषभ पंत (Rishabh Pant) संघात खेळण्याची शक्यता आहे. आयर्लंड (Ireland) संघाचे माजी कर्णधार ट्रेंट जॉन्स्टन (Trent Johnston) यांच्या मार्गदर्शनाखाली हाँगकाँग भारताचा सामना करणार आहे.

तसेच हाँगकाँग संघाचे सर्व खेळाडू ८०० दिवसानंतर मैदानात उतरणार आहेत. याशिवाय हाँगकाँगच्या संघात प्रामुख्याने भारत (India) बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान, हाँगकाँगचे नेतृत्व निजाकत खान (Nijakat Khan) करत असून उपकर्णधारपद किंचित शहाकडे (Kinchit shah) आहे. तसेच याच संघात आयुष शुक्ला याचाही समावेश आहे. तर पात्रता फेरीतील ३ सामने जिंकून प्रचंड फॉर्मात असलेला हाँगकाँग भारताला कडवी झुंज देण्यात कितपत यशस्वी होणार? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

सलील परांजपे, नाशिक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com