Asia Cup 2022 : IND Vs PAK- पाकिस्तानचा भारतावर ५ गडी राखून विजय
दुबई | वृत्तसंस्था Dubai
दुबई इंटरनॅॅशनल स्टेडियमवर आज आशिया चषक २०२२ चा क्रिकेटचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. यात पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघावर ५ गडी विजय मिळविला.
पाकिस्तानच्या संघाने नानेफेक जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून सलामीला के.एल.राहुल व रोहित शर्मा प्रथम फलंदाजीस आले. सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरवात केली. रोहित शर्माने १६ चेंडूत ३ चौकार व २ षटकार लगावत एकून २८ धावा केल्या. एच रौफच्या गोलंदाजीवर रोहित शर्माला झेलचीत केले. के.एल.राहुलने २० चेंडूत १ चौकार व २ षटकार लगावत २८ धावा करत मोहमद नवाज कडून झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने १० चेंडूत १३ धावा करत असिफ अली कडून झेल बाद झाला. रिषभ पंत १२ चेंडूत १४ धावा केल्या. हार्दिक पंड्याला च्या सामन्यात शून्यावर माघारी परतला. दीपक हुड्डाने १४ चेंडूत सोळा धावा करत मोहमद नवाज करवी झेल बाद झाला.
आजच्या सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४४ चेंडूत ४ चौकार व १ षटकार लगावत ६० धावा केल्या.असिफ अली ने विराट कोहलीला झेल बाद केले. २०व्या षटका अखेर भारतीय संघाने ७ गडी बाद १८१ धावा केल्या.
भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघास १८२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानच्या संघाकडून मोहमद रिजवान व बाबर आजम प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या चौथ्या षटकात रोहित श्रमाने बाबर आजम ला झेलचीत करत माघारी पाठविले. बाबर आजम ने १० चेंडूत १४ धावा केल्या. युजवेन्द्र चहलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने फखर जमानला १५ धावांवर झेल बाद केले. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाने मोहमद नवाजला झेलबाद केले.मोहमद नवाजने २० चेंडूत ४२ धावा केल्या. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने मोहमद रिजवानला झेलबाद केले. मोहमद रिजवानने ५१ चेंडूत ७१ धावा केल्या. शेवटचे ३ चेंडू बाकी असताना अर्श दिप्सिंगने असिफ अलीला पायचीत केले.