Copa America : तब्बल २८ वर्षानंतर अर्जेंटिनाने पटकावला 'कोपा अमेरिका' स्पर्धेचा किताब

Copa America : तब्बल २८ वर्षानंतर अर्जेंटिनाने पटकावला 'कोपा अमेरिका' स्पर्धेचा किताब

दिल्ली | Delhi

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामना (Copa America 2021 Final) अर्जेंटिना व ब्राझील (Argentina vs Brazil) यांच्यात झाला. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनानं (Argentina) कोपा अमेरिका (Copa America) स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला (Brazil) धूळ चारत १-० अशा फरकानं विजेतेपदावर नाव कोरलं. तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. स्टार फुटबॉलर आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) संघाचे नेतृत्व केले. मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटीनाने हा सामना जिंकला. मेस्सीला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय ट्रॉफी पटकावली आहे.

कोपा अमेरिका २०२१च्या (Copa America 2021) अंतिम सामन्यात मेस्सी (Messi) आणि नेमार (Neymar) हे खेळाडू एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. त्यामुळे फुटबॉल प्रेमींसाठी यंदाचा कोपा अमेरिका सामाना खास ठरला आहे. एंजल डी मारियाने (angel di maria) २१ व्या मिनिटाला गोल करुन संघाचा विजय केला. १९९३ नंतर अर्जेंटीनाच्या संघाने ४ वेळा कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेतही ते अंतिम सामन्यापर्यंत पोहचले होते. तर ब्राईलने आतापर्यंत ९ वेळा कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे. २०१९मध्ये देखील ब्राझीलने कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता.

फुटबॉल वर्ल्ड कप (FIFA World Cup), युरो कपनंतर (Euro Cup) कोपा अमेरिका ही तिसरी सर्वाधिक पाहिली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. इंग्रजीत कोपा अमेरिका म्हणजे अमेरिकन कप. १९७५ पर्यंत या स्पर्धेला साऊथ अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा म्हणून ओळखले जात होते. कोपा अमेरिका ही स्पर्धा फार जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून परिचीत आहे. कोपा स्पर्धेला Commebol कोपा अमेरिका असेही म्हटले जाते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com