Video : लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघ बालबाल बचावला, नेमकं काय घडलं?

Video : लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघ बालबाल बचावला, नेमकं काय घडलं?

नुकताच अर्जेंटिना संघाने फिफा विश्वचषक २०२२ जिंकला. आता या संघाचे मायदेशात जोरदार स्वागत होत आहे. ३६ वर्षांनंतर अर्जेंटिना देशवासीय विश्वचषक जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करत आहेत.

आनंदोत्सवात अर्जेंटिनाचा संघ बसमध्ये ट्रॉफी घेऊन चाहत्यांसोबत रॅलीत सहभागी झाला. या रॅलीत मोठी दुर्घटना टळली असून मेस्सीसह पाच खेळाडू बालंबाल बचावले आहेत.

अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू ट्रॉफीसह बसमध्ये चढून रॅलीत सहभागी झाले. अर्जेंटिना संघ चाहत्यांसह शहरात फिरत होता. ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या बसच्या छतावर मेस्सीसह पाच खेळाडू बसले होते.

त्यानंतर या खेळाडूंसमोर विजेची तार आली. सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आले नाही, पण योग्य वेळी एका खेळाडूने ते पाहिले आणि सर्वांना सावध केले. यामुळे सर्व खेळाडू नतमस्तक झाले आणि बस विजेच्या तारेखाली गेली.

या तारेमुळे खेळाडूंना विजेचा धक्का बसण्याचा धोका नव्हता, मात्र तारेवर आदळल्याने हे खेळाडू बसमधून खाली पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com