भारताविरुद्ध मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा; 'या' खेळाडूंना संधी

भारताविरुद्ध मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा; 'या' खेळाडूंना संधी

कोलंबो | Colombo

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला रविवार १८ जुलैपासून कोलंबो (Colombo) येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय (ODIs) आणि ३ टी २० (T-20) सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे...

इंग्लंडविरुद्ध (England) मालिकेच्या पराभवानंतर श्रीलंकेने आपल्या संघात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. भारताविरुद्ध मालिकेत नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी श्रीलंका सज्ज आहे.

श्रीलंका संघाने भारताविरुद्ध मालिकेसाठी दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा (उप कर्णधार), अविस्का फर्नान्डो, बी राजापक्षे, पी, निशनाका, सी असालंका, वनिंदु हसारंगा, ए बंदारा, एम भानुका, एक उदारा, आर मेंडिस, सी करुणारत्ने, बी फर्नान्डो या खेळाडूंचा समावेश केला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com