T 20 World Cup : टी २० वर्ल्डकपसाठी अशी असेल 'टीम इंडिया'

T 20 World Cup : टी २० वर्ल्डकपसाठी अशी असेल 'टीम इंडिया'

यूएई | UAE

येत्या १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) टी २० वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे...

या पार्श्वभूमीवर भारतीय १५ सदस्सीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. आतंरराष्ट्रीय पदार्पणानंतर भारतीय संघात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि युवा लेगस्पिनर फिरकीपटू राहुल चाहर (Rahul Chahar) याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

ओव्हल कसोटी क्रिकेट सामन्यात दोन्ही डावात शानदार अर्धशतक ठोकणाऱ्या शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) राखीव खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे.

शिवाय टीम इंडियाच्या मार्गदर्शक म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एम. एस. धोनीची (M. S. Dhoni) निवड करण्यात आली आहे. विराट कोहली संघाचा कर्णधार रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, ईशान किशन, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह,

राखीव खेळाडू

श्रेयस अय्यर, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com