T 20 World Cup : टी २० वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा; 'या' खेळाडूंचा समावेश

T 20 World Cup : टी २० वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा; 'या' खेळाडूंचा समावेश

यूएई | UAE

येत्या १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) टी २० वर्ल्डकप (T 20 World Cup) स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. हळूहळू टी २० वर्ल्डकप स्पर्धेचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे...

भारताच्या १५ सदस्सीय संघाची (Team India) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली. आता भारतापाठोपाठ टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आपापल्या संघाची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) आपल्या संघाचे नेतृत्व कर्णधार आयॉन मॉर्गनकडे (Eoin Morgan) कायम ठेवले आहे.

इंग्लंड संघाचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज टिमल मिल्स (Tymal Mills) याने संघात पुनरागमन केले आहे. अनेक टी २० लीग स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवल्यामुळे त्याला इंग्लंड संघात पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. गुरुवारी ९ सप्टेंबर रोजी इंग्लंड संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

T 20 World Cup : टी २० वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा; 'या' खेळाडूंचा समावेश
Visual Story : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचा जीवनप्रवास तुम्हाला माहीत आहे का?

मात्र इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू बेन स्ट्रोक्सने (Ben Strokes) आपल्या मानसिक अस्वस्थ पणामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून काही काळ विश्रांती घेतल्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आता यूएईत होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याला आपला सहभाग नोंदवता येणार नाही.

इंग्लंड संघाने (Team England) २०१० मध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर मात करून आपले पहिले विजेतेपद पटकावले होते.

तर २०१६ साली कर्णधार ऑईन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाला कोलकाता येथे झालेल्या अंतिम लढतीत २०१२ सालचा विजेत्या विंडीज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता ५ वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर यूएईच्या मायभूमीवर प्रथमच टी २० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. माजी विजेत्या इंग्लंड संघाचा समावेश अ गटात करण्यात आला आहे.

या गटात इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलिया (Australia), दक्षिण आफ्रिका (South Africa), विंडीज आणि पात्रता फेरीतील दोन विजयी संघांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लड आपली कामगिरी पुन्हा एकदा उंचावणार का ? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

इंग्लंड संघ

आयॉन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेरस्टो, जोस बटलर, क्रिस जॉर्डन, सॅम करण, लियम लिंगविस्टन, डेविड मलान, जेसन रॉय, आदिल रशीद, टीमाल मिल्स, डेविड विले, क्रिस वोक्स, मार्क वूड.

सलिल परांजपे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com