IPL २०२२ : नवीन संघ खरेदीसाठी अदानी ग्रुप शर्यतीत

IPL २०२२ : नवीन संघ खरेदीसाठी अदानी ग्रुप शर्यतीत

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या नवीन हंगामासाठी जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी दोन नवीन संघांना संधी देण्यात येणार आहे. या दोन संघांची घोषणा बीसीसीआय (BCCI) ऑक्टोबरमध्ये करण्याची शक्यता आहे. बोली लावण्यासाठी ऑगस्टमध्ये सुरुवात होऊ शकते...

आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी अहमदाबाद (Ahmedabad) आणि हैदराबाद (Hyderabad) या दोन संघांची नावे सध्या आघाडीवर आहेत.

अदानी ग्रुपचे (Adani Group) गौतम अदानी (Gautam Adani) आणि आर पी संजीव गोयंका ग्रुप (RP Sanjeev Goenka Group) यांनी नवीन संघांच्या खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली आहे. हैदराबादचा ओरोबिंडो फार्मा (Aurobindo Pharma of Hyderabad) आणि गुजरातचा टोरेंट ग्रुप (Torrent Group of Gujarat) ही दोन प्रमुख नावे सध्या चर्चेत आहेत.

बीसीसीआयने पुढील हंगामासाठी होणाऱ्या लिलावात नवीन नियम लागू करण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, आयपीएलमधील प्रत्येक संघाला आपल्या संघातील किमान ४ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

यात ३ भारतीय आणि १ परदेशी खेळाडू संघात कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय बीसीसीआयने पुढील हंगामासाठी प्रत्येक संघाची सॅलरी पर्स ८५ हून ९० कोटी इतकी केली आहे. यातील ७५ टक्के रक्कम प्रत्येक संघाला पुढील लिलावात खर्च करावी लागेल. गरज पडल्यास ही पर्स पुढील हंगामासाठी अजून वाढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हा लिलाव डिसेंबरमध्ये पार पडण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएलमध्ये ८ संघ सहभागी होत असून प्रत्येक संघ एकूण १४ सामने खेळतो. त्यानंतर बाद फेरीचे ४ सामने मिळून एकूण ६० सामन्यांचे आयोजन करण्यात येते. आता पुढील वर्षी दोन नवीन संघांच्या समावेशाने ही संख्या वाढवली जाऊ शकते.

सलिल परांजपे, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com