रोजगार हमीच्या मंजूर कामाना गती द्या-पालकमंत्री संदिपान भुमरे

रोजगार हमीच्या मंजूर कामाना गती द्या-पालकमंत्री संदिपान भुमरे

औरंगाबाद - aurangabbad

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) अंतर्गत रस्ते, फळबाग लागवड व इतर कुशल- अकुशल प्रकारातील विविध विकास योजनांचा समावेश होतो. या विकास योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी आढावा बैठकीत दिले.

रोजगार हमीच्या मंजूर कामाना गती द्या-पालकमंत्री संदिपान भुमरे
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयोअंतर्गत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या विकास कामाचा तालुकानिहाय आढावा पालकमंत्री यांनी घेतला. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्यासह सर्व तहसिलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कामागारची संख्या, नोंदणी जॉबकार्ड, उपस्थिती, ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज, प्रत्यक्ष पूर्ण झालेली काम व अपूर्ण काम सात दिवसाच्या आत सुरू करुन तालुकानिहाय आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी आपल्यास्तरावरुन घेण्याबाबत मंत्री भुमरे यांनी सूचना केली.

नऊ तालुक्यात पूर्ण झालेले व उर्वरित मंजूर रोहयोचे कामाच्या बाबतीत पंधरा दिवसाच्या आत घेतला जाईल. यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही संबधित यंत्रणेला पालकमंत्र्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com