Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedया प्राणिसंग्रहालयाचे लवकरच स्थलांतर

या प्राणिसंग्रहालयाचे लवकरच स्थलांतर

औरंगाबाद – aurangabad

सिद्धार्थ उद्यानातील (Siddhartha Udyan) प्राणिसंग्रहालयाचे (Zoo) येत्या दोन वर्षांत स्थलांतर होणार आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाची जागा उद्यानाला मिळणार असून ३२ एकर जागेतील उद्यानात मनमुराद फिरण्याचा आनंद बाळगोपाळांसह नागरिकांना घेता येणार आहे.

- Advertisement -

उद्यापासून भरणार शिक्षकांची शाळा

महापालिकेचे (Municipal Corporation) सिद्धार्थ उद्यान सध्या दहा ते बारा एकरात तयार करण्यात आले आहे. उद्यानाला लागूनच सुमारे बावीस एकरात प्राणिसंग्रहालय तयार करण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयाची जागा मुळातच उद्यानाची होती; पण प्राणिसंग्रहालय देखील महापालिकेचेच असल्यामुळे त्याला उद्यानाची जागा देण्यात आली. त्याशिवाय उद्यानाच्या जागेत एक एकरावर पोहण्याचा तलाव तयार करण्यात आला. उद्यानाची एकूण जागा सुमारे ३५ एकर आहे. त्यापैकी प्राणिसंग्रहालय, पोहण्याचा तलाव आणि बीओटी प्रकल्प यासाठी जागा दिल्यामुळे उद्यानाचे क्षेत्र कमी झाले.

मिटमिटा येथे (Smart City) ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून सफारी पार्कचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन वषांत हे काम पूर्ण होईल, असे मानले जात आहे. सफारी पार्कच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सफारी पार्कचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. सफारी पार्कचे काम पूर्ण झाल्यावर सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय लगेचच सफारी पार्कमध्ये स्थलांतरित केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्राणिसंग्रहालय स्थलांतरित झाल्यावर सिद्धार्थ उद्यानाचा विस्तार केला जाणार आहे. विस्तारित सिद्धार्थ उद्यान ३२ एकर जागेवर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उद्यानाच्या विस्तारित जागेच ‘थीम पार्क’ करण्याचे नियोजन केले जात आहे. हे थीम पार्क परयंटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या