Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedतीनशे शाळांवर सोलर पॅनल बसणार

तीनशे शाळांवर सोलर पॅनल बसणार

औरंगाबाद – aurangabad

जिल्ह्यातील २ हजार १३२ शाळांवर (CSR Fund) सीएसआर फंडातून सोलर पॅनल (Solar panel) बसवण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Union Minister of State for Finance Bhagwat Karad) यांनी शाळांची (School) माहिती मागवली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण (Primary Education Officer Jayashree Chavan) यांनी दिली. साधारणपणे एका शाळेला सातशे ते साडेसातशे-आठशे रुपयांपर्यंत वीज बिल येते. सौर पॅनल बसवल्याने या खर्चाची बचत होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून वीज बिल भरले नाही म्हणून अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर आता शाळांना विजेसाठी स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील २१३२ शाळांमध्ये विजेचा किती वापर होतो, त्यासाठी किती वार्षिक खर्च होतो, विजेची किती गरज आहे, ती सौरऊर्जेतून पूर्ण होईल का, याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. लोकसहभागातून गंगापूर, पैठण तालुक्यात ४० ते ५० शाळांवर सौरऊर्जेचे संच बसवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता पहिल्या टप्प्यात पहिली ते आठवीचे वर्ग असलेल्या मोठ्या २५० ते ३०० शाळांवर सोलार पॅनल बसवण्यासाठी प्रस्ताव देण्यात येईल. सर्वच शाळांत सौरऊर्जेचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या