Video : ...असे झेंडावंदन तुम्ही कधी पहिले नसेल; व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

Video : ...असे झेंडावंदन तुम्ही कधी पहिले नसेल; व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

२६ जानेवारीला म्हणजेच काल भारतात सर्वत्र ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic day celebration) साजरा केला. यादरम्यान सोशल मीडियात (Social media) पूर्णपणे हाऊसफुल झालेला दिसून आला....

अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने देशप्रेम व्यक्त केले. कुणी रात्री बारा वाजेपासूनच फोटो, व्हिडीओ शेअर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी प्रत्यक्ष ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित राहून खिशाला भारताचा तिरंगा लावत फोटोसेशन केले. यानंतर हे फोटो व्हायरल झालेले बघायला मिळाले.

दुपारनंतर दिल्लीतील राजपथावर (Rajpath new delhil) जैवविविधतेचे अनोखे दर्शन देणारा चित्ररथ साकारल्यानंतर या चित्ररथाचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र शेअर केले. तसेच ऑनलाईन या चित्ररथांची निवड होणार असल्याचे समजल्यावर मतदानाच्या या लिंकदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या दिसून आल्या.

या सर्व बाबींमध्येही एक व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी ग्रामीण भागातील या अनोख्या देशप्रेमाबद्दल भरभरून कौतुक केले. एक वयोवृद्ध महिला या व्हिडीओमध्ये देशाचा तिरंगा फडकावताना दिसून येत आहे. तसेच तिच्या आजूबाजूला असलेले लहानगे ध्वजारोहण (Flag Hosting) झाल्यानंतर भारत माता की जय (Bharat mata ki jay) म्हणत सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवतात.

विशेष म्हणजे एक लहान बाळ या व्हिडीओमध्ये त्याला काहीही समजत नाही पण त्याचा उत्साह बघून अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र दिसते आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला आहे, हे समजत नाहीये. पण या व्हिडीओतील ज्या भावना आहेत त्या मात्र डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहणार नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com