Thursday, April 25, 2024
HomeUncategorized... तर तिसरी लाट येणार हे निश्चित!

… तर तिसरी लाट येणार हे निश्चित!

औरंगाबाद- Aurangabad

  कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसलेली नसताना अनलॉकच्या काही दिवसांतच शहरभर गर्दीच गर्दी झाल्याचे भयाण चित्र आहे. ३० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचे मास्क चेहऱ्यावरून एकतर घसरले आहेत; नाहीतर गायब झाले आहेत. सुरक्षित वावराचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्वत्र तिसऱ्या लाटेच्या पाऊलखुणा दिसत असल्याचे तज्ज्ञांनी या स्थितीला अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

अनलॉक होताच अनेक जण जणू सर्वकाही कोरोनामुक्त झाले असल्याच्या बिनधास्त वातावरण रोजच नव्या-नव्या परिसीमा गाठत आहेत. हॉटेल, मॉल, दुकानांमध्ये तोबा गर्दी दिसून येत आहे. किमान २५ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचे मास्क खाली घसरलेले आढळून येत आहेत; म्हणजेच मास्कने नाक-तोंड पूर्णपणे झाकलेले नसतेच, असे सार्वत्रिक चित्र आहे. अनेक जण तर चक्क मास्क काढूनच बोलत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रिक्षाचालक, दुकानदार, फळ-भाजी विक्रेते आणि अनेक सुजाण नागरिकही अग्रेसर आहेत.

जागोजागी गर्दी असल्याने किमान सहा फुटांच्या अंतराचा फज्जा उडाला आहे. ही एकूणच स्थिती तिसऱ्या लाटेला पूर्णपणे पोषक असल्याचे फिजिशियन असोसिएशनचे शहर अध्यक्ष डॉ. संजय पाटणे म्हणाले, ‘एकीकडे लसीकरण अतिशय अपुरे असतानाच नागरिकांचा बेजबाबदार वावर, हे तिसऱ्या लाटेला नक्कीच आमंत्रण देणारे आहे.

खरे तर लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे अपेक्षित होते; पण तसे झालेले नाही. आता अनलॉकमुळे नागरिक बिनधास्त झाले आहे. नको तिथे नको तेवढी बेफाम गर्दी होत आहे. नागरिक करोना व लॉकडाउनला कंटाळले आहेत, हे मान्य केले तरी सुरक्षिततेचे नियम पाळण्याची अजूनही खरोखर गरज आहे. हे असेच सुरू राहिले, तर तिसरी लाट येणार हे निश्चित.’

- Advertisment -

ताज्या बातम्या