Monday, April 29, 2024
HomeUncategorizedआता चॉईस नंबरसाठी मोजावे लागणार इतके रुपये!

आता चॉईस नंबरसाठी मोजावे लागणार इतके रुपये!

औरंगाबाद – aurangabad

टू व्हिलर (Two wheeler) आणि फोर व्हिलर (four wheeler) वाहनांच्या चॉईस नंबरसाठी (Choice No) दराचे नवे प्रारूप राज्य सरकारने नुकतचे जारी केले आहे. त्यामध्ये २५ हजारापासून ते पार पाच लाखापर्यंत दर आहे. यापूर्वीच्या तुलनेत हेदर आता वाढलेले आहेत.

- Advertisement -

अनेक वाहन शौकिन महागडी वाहने खरेदी करणारे आहेत. अनेकजण आपल्या वाहनाला मनपसंत नंबर मिळवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. त्यासासाठी अतिरिक्त शुल्क भरण्याची त्यांची तयारी असते. अनेकवेळा अधिकचे शुल्क भरून जम्पिंग नंबर घेतले जातात. कुणी वाढदिवसाची तारीख तर कुणी लकी नंबर चॉईस करतात. अशा हौशी वाहन धारकांसासाठी सरकारने आता नव्या दराचे प्रारूप जारी केले आहे. या नवीन दराप्रमाणे टू व्हिलर, थ्री व्हिलर आणि परिवहन वाहने वगळता २५ हजार ते पाच लाख रुपये असा दर ठेवण्यात आलेला आहे. ०००९, ००९९, ०७८६, ०९९९, ९९९९ या क्रमांकासाठी पाच लाखांचा दर राहणार आहे. 

याशिवाय चॉईस नंबरप्रमाणे अडीच लाख, एक लाख, ७० हजार, २५ हजार असे दर आहेत. टू व्हिलर, थ्री व्हिलर आणि परिवहन बाहनांसाठी किमान दर सात हजार आणि कमाल दर एक लाख एवढा आहे. ज्या क्रमांकासाठी पाच लाख आकारले जात आहेत, त्याच क्रमांकासाठी टू व्हीलर, थ्री  व्हीलर वाहनांन एक लाख रुपये भरावे लागणार आहे. या श्रेणीत ५० हजार, २५ हजार, १५ हजार असे दर आहेत. परंतु, औरंगाबाद, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, रायगड या जिल्ह्यात त्याच नंबरसाठी पाच लाख रुपये दर राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या