Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedस्मार्ट सिटीचा उपक्रम ; आता व्यावसायिकांना अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर

स्मार्ट सिटीचा उपक्रम ; आता व्यावसायिकांना अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर

औरंगाबाद – aurangabad

शहरातील (Professional) व्यावसायिक नळ कनेक्शनला (Ultrasonic water meter) अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय (Municipal Corporation) महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशनच्या (Smart City Development Corporation) मदतीने घेतला आहे. सुमारे पाच हजारांवर व्यावसायिक मालमत्तांना हे मीटर लावले जातील. त्यामुळे पाण्याच्या किती वापर होतो, तेवढेच बिल देण्यात येणार आहे.

- Advertisement -

औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर नागरिकांना दररोज मुबलक पाणी मिळेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता वॉटर मीटरचा मुद्दा पुढे आला आहे. राज्यातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये वॉटर मीटर ही संकल्पना राबवण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा जेवढा वापर होईल, तेवढेच बिल नागरिकांना भरावे लागत आहे, वार्षिक पाणीपट्टीचा विषय त्यामुळे मागे पडला आहे. औरंगाबाद शहरातही वॉटर मीटरची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यात अनुषंगाने महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर असलेले अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे प्रशासक व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यात शहरातील व्यावसायिक नळांना मीटर बसवले जाणार आहेत. पालिकेतील नोंदीनुसार पाच हजारावर व्यावसायिक मालमत्ता शहरात आहेत, या मालमत्तांना पहिल्या टप्प्यात मीटर लावले जाणार आहेत. अल्ट्रासॉनिक वॉटर मीटरमुळे पाण्याचा प्रवाह, पाणीपुरवठा, पाण्याचा वापर याची माहिती प्रशासनाकडे संकलित होणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून वॉटर मीटरवर नियंत्रण ठेवले जाणार आहे, पाणी वापरावर निरीक्षण केले जाणार आहे. वॉटर मीटरसाठी स्मार्ट सिटीचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान काम करीत आहेत.

वॉटर मीटरच्या प्रकल्पासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम्, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती वॉटर मीटरची निवड करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या