Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत स्मार्ट सिटी बसची वाहतूक सुरू

औरंगाबादेत स्मार्ट सिटी बसची वाहतूक सुरू

औरंगाबाद – Aurangabad

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे फेब्रुवारीपासून बंद असलेली सिटीबस सेवा मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पाच मार्गांवर सोळा सिटीबस धावणार असून दिवसभरात त्यांच्या २४१ फेऱ्या होतील.

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे निर्णय घेत गतवर्षी मार्चमध्ये सिटीबस सेवा बंद केली होती, कोरोना संसर्गाची पहिली लाट ओसरल्यावर नोव्हेंबरमध्ये सिटीबस सुरू करण्यात आल्या, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे फेब्रुवारी महिन्यापासून सिटीबस सेवा पुन्हा बंद करण्यात आली. आता शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनाने सर्व व्यवहार सुरळीत सुरू केले आहेत. त्यामुळे सिटीबस सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मार्ट सिटीच्या सिटीबस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर व उप व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोडे यांनी या बद्दल माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपासून पहिल्या टप्प्यात शहरातील पाच मार्गांवर सोळा सिटीबस सुरू होतील. दिवसभरात त्यांच्या २४१ फेऱ्या होतील. सकाळी दहा वाजता सिडको बसस्टँड येथून सिटीबस सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. सिटीबस मधून प्रवास करताना प्रवाशांनी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे, त्याशिवाय सॅनिटायझरचा वापर करणे, शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल असे पवनीकर यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या