नव्या वर्षात 'स्मार्ट आरोग्य मिशन' राबवणार

औरंगाबाद महापालिकेचा संकल्प
नव्या वर्षात 'स्मार्ट आरोग्य मिशन' राबवणार

औरंगाबाद - aurangabad

महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवर्षात स्मार्ट आरोग्य मिशन (Smart Health Mission) राबवण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय स्मार्ट सिटीतून शाळांना स्मार्ट लूक दिला जात आहे. आता स्मार्ट आरोग्य मिशनमधून प्रायमरी सर्व सुविधा पालिकेच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे प्रशासक डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या काळात साफसफाईसह सोबतच रिक्‍त पदे व नव्या पदांची भरती प्रक्रिया, नवीन जल योजनेच्या कामाला गती देऊन महत्त्वाची कामे पूर्ण करून घेणे, शंभर कोटीचे रस्ते, सातारा-देवळाई ड्रेनेज प्रकल्प, जी-२० परिषदेसाठी सौंदर्यीकरण व॒ सुशोभिकरणाची कामे पूर्ण येत्या वर्षभरात पूर्ण केली जातील, असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद पालिकेच्या ४० व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका मुख्यालयात पत्रकार कक्षाचे उद्‌घाटन प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता आर.एन. संधा, शिक्षणाधिकारी सोनार, उपअभियंता काटकर, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती.

नोकर भरतीची प्रक्रिया राबवणार


पालिकेचा आकृतीबंध व सेवा भरती नियमाला मंजूरी मिळालेली आहे. त्यानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील नवीन पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे रोष्टर पाठवून त्यास मंजुरी घेतली जाईल. तसेच वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी रोष्टर तयार करून मागासवर्ग कक्षाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येईल. त्यास मंजूरी मिळताच नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

जी-२० महिला परिषदेच्या तयारीसाठी राज्य शासनाने ५० कोटीचा निधी पालिकेला उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून अत्यंत कमी वेळेत चांगल्या पद्धतीने महत्त्वाची कामे केल्या जातील. शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यासाठी लागणारी तांत्रिक कामांची निविदा अंतिम केली आहे. नवीन विकास आराखडा पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण करण्यात येईल. मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित करून अधिक कर वसूली करू, असे प्रशासकांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com