Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत आणखी सहा जणांना गोवरची लागण

औरंगाबादेत आणखी सहा जणांना गोवरची लागण

औरंगाबाद – aurangabad

शहरात गोवर (Measles) आजाराने पाय पसरायला सुरुवात केली आहे. मंगळवारी गोवरची आणखी सहा संशयित बालके आढळून आली. त्यामुळे गोवर आजाराच्या संशयित बालकांची संख्या ६० झाली आहे. मंगळवारी एकही बालक गोवर पॉझिटिव्ह आढळून आले नाही.

- Advertisement -

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी याबद्दल माहिती दिली. दोन दिवसात सहा संशयित बालके आढळून आले असून गोवर पॉझिटिव्ह एकही बालक मंगळवारी आढळून आले नाही. आढळून आलेली बालके मिटमिटा, गणेश कॉलनी, रोशनगेट, शहाबाजार, बालाजीनगर आणि कांचनवाडी येथील आहेत.

दरम्यान, महापालिकेने लसीकरणासाठी शिबिरांचे आयोजन देखील केले आहे, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. शनिवार ते मंगळवारदरम्यान पाच शिबिरे झाली. त्यात लसीचा पहिला डोस (एमआर-१) १२४ बालकांना तर दुसरा डोस (एमआर-२) ११२ बालकांना देण्यात आला. शिबिराची व्याप्ती बुधवारपासून वाढवण्यात येणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. 

लसीसाठी विचारणा
नऊ महिने ते १२ महिन्यांदरम्यान बालकांना गोवर आणि रुबेला लसीचा पहिला डोस दिला जातो. तर १६ महिने ते २४ महिन्यांदरम्यात दुसरा डोस दिला गतो. परंतु, अनेक बालके या दोन्ही डोसपासून दूर राहिली आहेत. शहरात गोवरचे संशयित पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर पालकांकडून आता लसीसाठी विचारणा केली जात आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रापासून, तर खासगी रुग्णालयही गाठले जात आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या