साडेसहा हजार स्तनदा मातांनी घेतला दुसरा डोस

लसीकरण वाढवण्याची गरज 
साडेसहा हजार स्तनदा मातांनी घेतला दुसरा डोस

 औरंगाबाद- Aurangabad

लसीकरण वाढीसाठी जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असूनही लसीकरणात (vaccination) अद्याप बरीच प्रगती साध्य करायची आहे. त्यातच गरोदर व स्तनदा मातांनाही (Pregnant and lactating mothers) लसीकरणासाठी आवाहन करण्यात येऊनही अद्याप ६ हजार ५६७ जणांनीच कोरोनाचा दुसरा डोस (Second dose of Corona) घेतला आहे. यात वाढ करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लसीकरण वाढीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग कमी पडत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला झालेल्यागरोदरमहिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाची स्थिती आजही 'जैसे थे' असून, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे गरोदर आणि स्तनदा महिलांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याबाबत आरोग्य विभागाला योग्य ती रणनीती आखून लसीकरण वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच मंकीपॉक्सचाही प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे, अशा सूचना सर्व फ्रंटलाइन वर्कर, हेल्थकेअर वर्कर यांनी त्यांचा बुस्टर डोस पूर्ण करुन घ्यावा अशाही सूचना आहेत. मात्र गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणात काहीही फरक पडलेला नसल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ५२ हजार महिलांची नोंदणी आहे. त्यापैकी १३ हजार ८९३ गरोदर आणि स्तनदा मातांची एकूण नोंदणी ५२ हजार जणांनी केली असून त्यापैकी १५ हजार ७५८ जणांनी पहिला तर ६ हजार ५६७ जणींनी दुसरा डोस घेतला आहे.

हे प्रमाण कमी असून महिलांमधील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्याचे विभागांना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com