राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या सदस्यपदी शितोळे

राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या सदस्यपदी शितोळे

औरंगाबाद - aurangabad

देवगिरी नागरी सहकारी बँकेचे (Devagiri Nagari Cooperative Bank) अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल (Governor) नियुक्‍त माजी सदस्य किशोर शितोळे यांची राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय सल्लागार समितीवर सदस्यपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आम्ही तीन वर्षासाठी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

किशोर शितोळे हे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य असून देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच 'जलदूत' या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांनी जलसंधारणा संदर्भात कार्य केले आहे. या नियुक्तीबद्दल किशोर शितोळे यांचे डॉ. प्रशांत कुमार वनंजे, (राज्य संपर्क अधिकारी, रासेयो कक्ष मंत्रालय) व विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com