आईची उब न मिळाल्याने पांढऱ्या वाघिणीच्या दुसऱ्या पिल्लाचा मृत्यू 

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – Aurangabd

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील भक्ती या वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचेही निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे प्राणिसंग्रहालयावर शोककळा पसरली आहे.

प्राणिसंग्रहालयातील भक्ती या वाघिणीने ३ एप्रिल रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता. जन्म दिल्यापासून तिने त्या बछड्यांना आपल्या जवळ घेतले नाही किंवा त्यांना दूधदेखील पाजले नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने बकरीचे दुध बछड्यांना पाजण्याचा निर्णय घेतला. बाटलीच्या सहाय्याने ठराविक अंतराने बछड्यांना बकरीचे दूध केअर टेकरच्या माध्यमातून पाजले जाऊ लागले.

दरम्यान ६ एप्रिलच्या रात्री वाघिणीचा पाय एका बछड्यावर पडला. पायाखाली बछडा दबून गेला. त्यामुळे त्याची हालचाल मंदावली आणि दूध पिण्याचे प्रमाणदेखील कमी झाले त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या बछड्याला वाचवण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. बछड्याला आईची उब मिळत नसल्यामुळे त्याला कृत्रिम उब मिळावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.

पिंजऱ्यात गादी ठेवण्यात आली. हिटर आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली. ठराविक अंतरावे दूधही पाजले जाऊ लागले, परंतु बुधवारी रात्री साडेदहाला त्याचा मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अश्विनी राजेंद्र यांनी बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे, वनपरिमंडळ अधिकारी ए. डी. तांगडे यांच्या उपस्थितीत बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *