रेमडेसिविरनंतर आता टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा!

इटोलीझुमॅब इंजेक्शनचा पर्याय खुला    
रेमडेसिविरनंतर आता टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा!

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनातील काही रुग्णांना द्यावे लागणार्‍या टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा आता तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून इटोलीझुमॅब या इंजेक्शनचा पर्याय सूचविण्यात आला आहे. मात्र आजघडीला या इंजेक्शनचाही तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांवरील उपचारांमध्ये अडथळा येत आहे.

मागील काही दिवसात गंभीर कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले. थेट रुग्णालये आता दाखल रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नोंदवू लागले आहेत. त्यामुळे नातेवाईकांची धावपळ काही प्रमाणात थांबली आहे. त्यामुळे शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.

परंतु टोसिलिझुमॅबअभावी आता रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. हे इंजेक्शन शहरात उपलब्धच नाही. टोसिलिझुमॅब ही इंजेक्शन कोरोना संसर्गाच्या उपचारावर खात्रीशीर उपयुक्त ठरतात, असा कोणताही शास्त्रीय आधार नाही. तरीही काही रुग्णांमध्ये याचा वैद्यकीय लाभ दिसून, आल्यामुळे ही इंजेक्शन दिली जात आहेत. या इंजेक्शनची मागणी वाढल्याने तसेच पुरवठा कमी झाल्याने ते उपलब्ध नाही. त्यामुळे टोसिलिझुमॅबऐवजी पर्याय म्हणुन इटोलीझुमॅब वापरण्याची सुचना दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून करण्यात आली आहे. परंतु हे इंजेक्शनही शहरात मिळेनासे झाले आहे.

टोसिलिझुमॅब सध्या उपलब्ध नाही. तर इटोलीझुमॅबचे चार इंजेक्शन उपलब्ध आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (औषध) सहआयुक्त संजय काळे यांनी दिली आहे. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com