औरंगाबादमध्ये लसी संपल्या

लसीकरणासाठी वेटिंग
औरंगाबादमध्ये लसी संपल्या

औरंगाबाद - Aurangabad

लसींचा साठा नसल्यामुळे आता (Municipal Corporation) महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला अचानक ब्रेक लागला आहे. मागील चार दिवसांपासून लस शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद अवस्थेत आहेत. आता नव्याने लसींचा पुरवठा कधी होईल, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण न फिरता घरातच थांबावे. परिणामी, (Corona) कोरोनाचा धोका वाढणार नाही, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर (Dr. Nita Padalkar) यांनी केले.

औरंगाबाद (Aurangabad) शहरात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला (Corona vaccine) प्रारंभ झाला आहे. अलीकडे 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच पालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वेग आला होता. पालिकेने शहरात 115 वॉर्डात जागोजागी केंद्र सुरू करून लसीकरण करण्यावर जोर दिला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींचा साठा मुबलक असल्याने 75 ते 80 हजारापर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाला तरूणांचा भरघोरू प्रतिसाद मिळाल्याने लसीचा साठा पाच दिवसातच संपला. दररोज 12 ते 17 हजार दरम्यान लसीकरण होत होते. मात्र आता लसींचा साठा संपल्यामुळे सोमवारपासून लसीकरण बंद पडले आहे. तरीही लस येईल या आशेने कुपन घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांच्या लांब रांगा गुरूवारी दिसून आल्या. मात्र त्यांना निराश होऊनच घरी परतावे लागले.

पालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाने एक लाख लस मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र अजूनही लस मिळालेली नसून कधी मिळेल, याची देखील शाश्‍वती नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com