Sunday, April 28, 2024
HomeUncategorized'गद्दारांना आडवे करू' ; चंद्रकांत खैरे

‘गद्दारांना आडवे करू’ ; चंद्रकांत खैरे

औरंगाबाद – aurangabad

अंबादास दानवे आणि मी आता एकत्र काम करायचे ठरवले आहे. मातोश्रीवरून आलेला प्रत्येक आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य आहे. आता आम्ही दोघे मिळून औरंगाबादमध्ये शिवसेनेतून (shivsena) जे लोक फुटले आहेत, त्यांना आडवे करू. त्यासाठी आम्ही दोघे पुरेसे आहोत, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी माध्यमांना सांगितले.

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात आता शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झालेले शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगाबादमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फटकारले. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंबादास दानवे हे प्रचंड अभ्यासू आहेत. ते महाराष्ट्रात फिरून आले आहेत. ते अनेकदा लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचत असतात. त्यामुळे आगामी काळात अंबादास दानवे हे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगले काम करतील, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. अंबादास दानवे आणि माझ्यात अनेकदा मतभेद झाले. कुटुंबातील अशाप्रकारचे मतभेद होत असतात. हे मतभेद तात्विक होते. पण मतभेद होत असताना आमच्यातील प्रेमही वाढत गेले, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या