शेगाव येथून श्रींची पालखी पंढरपूरकडे उद्या होणार मार्गस्थ

पालखीबरोबर शेकडो वारकऱ्यांसह असंख्य भक्त करणार पायी वारी
शेगाव येथून श्रींची पालखी पंढरपूरकडे उद्या होणार मार्गस्थ

दिपक सुरोसे

शेगाव - Shegaon

कोरोनामुळे (corona) मागील दोन वर्ष खंडित झालेली पंढरपूर पायदळ वारीची (Pandharpur Wari) श्रीं च्या पालखीची परंपरा यंदा पूर्ववत होत आहे. सोमवार ६ जून रोजी सकाळी ७ वा. शेगाव येथून (Sant Gajanan Maharaj) श्री संत गजानन महाराजांची पालखी मंदिरामधून ७०० वारकऱ्यांसह हजारो भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे.

गेल्या दोन वर्षाच्या खंडानंतर प्रथमच संतनगरीत श्रीं च्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर घुमेल. 

श्रींची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७२५ किलोमिटर प्रवास करत आषाढ शु-९ शुक्रवार ०८ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल.

१२ जुलै पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर आषाढ शु.१५ बुधवार १३ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगावकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. दि.३ ऑगष्ट २०२२ रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल. \

पालखीचे दर्शनाकरीता होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, आवश्यकते नुसार श्रींचे पालखीचे परिक्रमा मार्गामध्ये व मुक्कामाचे स्थळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, आवश्यक बदल करण्याचे संपूर्ण अधिकार हे पालखी प्रमुखाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. पालखी प्रमुखाचा निर्णय हा परिस्थितीनुरूप अंतिम राहील तरी सर्व भाविक भक्त व वारकरी मंडळींनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री संस्थानकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com