शेगाव : भारत जोडो यात्रा स्वागतासाठी संत नगरी सज्ज

काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते शेगावात दाखल
शेगाव : भारत जोडो यात्रा स्वागतासाठी संत नगरी सज्ज

दिपक सुरोसे

शेगाव - Shegaon

राहुल गांधी व भारत जोडो यात्रा शेगावला येण्यासाठी काही तासाचा अवधी उरलेला आहे त्यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह राज्यस्तरीय नेते शेगाव शहरात दाखल झाले आहेत.

शेगाव : भारत जोडो यात्रा स्वागतासाठी संत नगरी सज्ज
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री
शेगाव : भारत जोडो यात्रा स्वागतासाठी संत नगरी सज्ज
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

गांधी परिवारातील एक सदस्य शेगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) १८ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान जवळा पळसखेड फाट्यावर पोहोचेल त्या ठिकाणी राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

शेगाव : भारत जोडो यात्रा स्वागतासाठी संत नगरी सज्ज
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

त्यानंतर वरखेड फाट्यावर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणापर्यंत दिंडी काढून राहुल गांधीं यांना २१ फूट उंच विठ्ठलाच्या मूर्ती जवळ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकऱ्यांची वेशभूषा डोक्यावर टोपी, गळ्यामध्ये दुपट्टा आणि विणा अशा वारकऱ्यांच्या वेशभूषेत राहुलजी गांधी यांचे आगमन होणार आहे.

या ठिकाणी राहुल गांधी हे १००० वारकऱ्यांसमवेत पावली खेळणार आहेत, दुपारी चार वाजता श्री संत गजानन महाराजांच्यामंदिरात (Shri Sant Gajanan Maharaj) जाऊन ते श्रींचे दर्शन घेणार असून त्यानंतर राहुलजींचे आगमन सभास्थळ बाळापुर रोड येथे होणार आहे.

शेगाव : भारत जोडो यात्रा स्वागतासाठी संत नगरी सज्ज
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

राहुल गांधी हे लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील ही शेवटची व शेगाव शहरातील पहिली होणारी जाहीर सभा ऐतिहासिक व न भूतो न भविष्यती अशी व्हावी याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आमदार राजेश ऐकडे, काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ.स्वातीताई वाकेकर, प्रदेश प्रतिनिधी व खामगाव मतदार संघाचे पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रतिनिधी रामविजय बुरुंगले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र दादा पाटील, काँग्रेस पक्षाचे शेगाव शहराध्यक्ष किरणबापू देशमुख, जिल्हा सरचिटणीस कैलास बापू देशमुख,. जयंतराव खेडकर, प्रवीण सुरोशे, दीपक सलामपुरिया यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जिल्हा व स्थानिक अधिकारी कार्यकर्ते हे तन-मन-धनाने परिश्रम घेत आहेत.

शेगाव : भारत जोडो यात्रा स्वागतासाठी संत नगरी सज्ज
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com