Monday, April 29, 2024
HomeUncategorizedनातीचे लैंगिक शोषण ; नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

नातीचे लैंगिक शोषण ; नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

औरंगाबाद- Aurangabad

अल्पवयीन नातीसोबत अश्लील चाळे (Sexual abuse) करून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम ५६ वर्षीय चुलत आजोबाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आ. चौधरी यांनी ठोठावली.

- Advertisement -

प्रकरणात चार वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. महिलेच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने ती आपल्या मुलीसह माहेरी आईकडे राहण्यासाठी आली होती. ती २८ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा चुलत आजोबा घरी आला. तेव्हा ती स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेली. मात्र तिला शंका आल्याने तिने हॉलमध्ये पाहिले.

मात्र तेथे कोणीच दिसले नाही. त्यामुळे आतील खोलीत पाहिले तेव्हा आरोपी पीडितेशी अश्लील चाळे करून तिचे लैंगिक शोषण (Sexual abuse) करताना दिसला. पीडितेच्या आईने आरोपीला जाब विचारताच त्याने पळ काढला.

प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडितेची आजी आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने (Court) नराधमास दोषी ठरवून पोक्सो (Pokso)च्या कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या