Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedऑक्सिजन ऑडिटमध्ये आढळल्या अनेक त्रुटी

ऑक्सिजन ऑडिटमध्ये आढळल्या अनेक त्रुटी

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यात येत आहे अशातच अभियांत्रिकी, आयटीआय तज्ज्ञ शिक्षकांच्या तपासणीत जिल्ह्यातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन वापराचे ऑडिट पूर्ण केले असून त्यात फायर ऑडिट नसणे, स्टोरेजची अडचण, हाताळणी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष असल्याचे समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

सरकारी, खासगी हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारा ऑक्सिजनचा वापर योग्य, सुरक्षित पद्धतीने होतो का, याबाबत तंत्रशिक्षण विभागाकडे उपलब्ध तांत्रिक मनुष्यबळाची मदत घेत तपासणी करण्यात आली. इंजिनीअरिंग, आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांच्या टीम करून ही तपासणी करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ संस्थांनी ९१ रुग्णालयांची तपासणी पूर्ण केली. त्या अहवालामध्ये ऑक्सिजन वापरातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. वापराबाबत पुरेशी तांत्रिक माहिती रुग्णालयांना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऑक्सिजन टँकचा वापर सुरक्षित होतो का, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. तपासणी टीममधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रिकलचे ऑडिट झालेले नाहीत. फायर ऑडिटकडे अनेकांचे दुर्लक्ष आहे. ज्या ठिकाणी सिलिंडर आहेत ती जागा व्यवस्थित नसणे, अस्वच्छता, नियमावलीप्रमाणे स्टोरेज कसे हवे, याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक टीमने‍ निश्चित केलेल्या रुग्णालयांची तपासणी करून आपला अहवाल सादर केला.

जिल्हा प्रशासनासह टेक्निकल संस्थांच्या तपासणीचे आदेश येईपर्यंत औरंगाबादमध्ये ९१ रुग्णालये कोव्हिडसाठी होते. त्यानंतर काही नवीन रुग्णालयांची त्यात भर पडली. अशा १४ रुग्णालयांची तपासणीही तत्काळ केली जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यासाठी तीन जणांची टीम असेल, असेही सांगण्यात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या