Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये सात लाख जणांनी घेतली लस

औरंगाबादमध्ये सात लाख जणांनी घेतली लस

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद शहराने (Aurangabad City) सात लाखांवर नागरिकांचे लसीकरण (Corona vaccination) करण्याचा टप्पा (29 ऑगस्ट) पार केला. आता 4 लाख 77 हजार नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. लवकरच या नागरिकांचे लसीकरण देखील होईल, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर (Dr. Nita Padalkar) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

करोना प्रतिबंधासाठी महापालिकेने शहरात मेगा लसीकरण मोहीम सुरू केली. त्यासाठी 115 वॉर्डांमध्ये 115 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. सरकारच्या निर्देशानुसार विविध वयोगटांनुसार लसीकरण करण्यात आले. (28 ऑगस्ट) 6 लाख 99 हजार 257 नागरिकांचे लसीकरण झाले होते. सात लाखांचा टप्पा पार करण्यासाठी साडेसातशे नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे होते. हा आकडा शनिवारी पार करण्यात आला, अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली. आकडेवारीनुसार 4 लाख 91 हजार 772 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 2 लाख 7 हजार 485 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. औरंगाबाद शहरात लसीकरणाचे उद्दिष्ट 11 लाख 76 हजार 999 ठेवण्यात आले आहे.

सध्या पालिकेला सरकारकडून मुबलक प्रमाणात लशींचा साठा प्राप्त होत आहे. त्याशिवाय, बजाज उद्योग समुहाकडून महापालिकेला 1 लाख 20 हजार लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. नागिरकांनी याचा लाभ घ्यावा लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या