सिरम इन्स्टिट्यूच्या लसीचे सरकारमार्फत वाटप केलं जाणार
अन्य

सिरम इन्स्टिट्यूच्या लसीचे सरकारमार्फत वाटप केलं जाणार

ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधि) pune - पुण्यातील सिरम इन्सिट्यूटने कोरोनावरची लस तयार झाल्यानंतर ही लस लोकांना बाजारातून खरेदी करावी लागणार नाही तर सरकारमार्फेत याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान सिरमने ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करत पारसी समाजासाठी गरजेपेक्षा जास्त लस ठेवण्यासंबंधी ट्विट केल्यानंतर यावरून चर्चा सुर्रू झाली होती. मात्र, हे संभाषण दोन पारसी मित्रांमधले होते. लस तयार झाली की ती सर्वांसाठीच उपलब्ध असेल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

रविवारी अदर पूनावाला यांनी उद्योजक रॉनी स्क्रूवाला यांनी पारसींसाठी विशेष कोटा ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्यावर अदर पूनावाला यांनी उत्तर देताना हो ठेवणार असल्याचं सांगत आम्ही एका दिवसात एवढ्या लसींची निर्मिती करू की संपूर्ण जगातील पारसी समुदायातील लोकं सुरक्षित होतील असं म्हटलं होतं. मात्र, “हे दोन पारसींमधील मैत्रीपूर्ण आणि अत्यंत हलकं फुलकं संभाषण होतं, असे कंपनीच्या वतीने स्प्सध्य करण्यात आले आहे.

लस वाटपासंबंधी बोलताना कंपनीने सांगितलं आहे की, लोकांना बाजारातून ही लस खरेदी करावी लागणार नाही. सरकारमार्फेत याचं वाटप केलं जाणार आहे. “एकदा लस चाचणी पूर्ण आणि यशस्वी झाली की तर सरकारमार्फेत तिचं वाटप केलं जाईल,जेणेकरुन लोकांना ती थेट खरेदी करावी लागणार नाही,” असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान सिरमने ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी आता राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याने येथेच चाचणी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com