Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअज्ञात वाहनाच्या धडकेत इसम गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम गंभीर जखमी

मलकापूर – Malkapur

ग्राम शेलापुर नजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 45 वर्षीय इसम गंभीर जखमी होऊन रोडवर पडला असताना बघ्यांनी एकच गर्दी केली यावेळी…

- Advertisement -

कोणी मोबाईल द्वारे फोटो काढत होते तर कोणी नुसते पाहून आपल्या रस्त्याने जात होते एवढ्यात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीला जात असताना मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड.हरीश रावळ यांना गर्दी दिसली त्यांनी गाडीतून उतरुन जवळ जाऊन पाहिले असता एक इसम गंभीर जखमी अवस्थेत रोडवर पडला आहे, क्षणाचाही विलंब न लावता चालकाला गाडी वळविण्यास सांगत त्या जख्मीस उपचारार्थ मलकापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

शेलापुर येथील पंडित त्र्यंबक अहीरे वय 42 हा बजाज प्लेटिना दुचाकी मो.सा.क्रं.Mh 28 BG 7554 ने शेलापुर कडुन मोताळ्याकडे जात असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली या धडकेत अहीरे गंभीर जख्मी होऊन रस्त्यावर पडून असल्याने नगराध्यक्ष अॅड हरीश रावळांनी त्यास मलकापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती रावळ यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या