Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलिचेडची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव

लिचेडची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव

औरंगाबाद (Aurangabad) –

चिकलठाणा व पडेगाव येथील महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प (Waste processing project) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. येथे रोज सुमारे 300 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र चिकलठाणा प्रक्रिया प्रकल्पातील लिचेड थेट नाल्यात जात असल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी दोनवेळा आंदोलन करून हा प्रकल्पा बंद पाडला. या आंदोलनानंतर पालिका प्रशासन कर्तव्याला जागले असून लिचेडची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

- Advertisement -

तीन वर्षांपूर्वी नारेगाव डेपो परिसरातील नागरिकांच्या आंदोलनामुळे शहरात अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण झाली होती. यानंतर औरंगाबाद पालिकेने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल व कांचनवाडी येथे शासन निधीतून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यातील हर्सूल वगळता इतर प्रकल्प मागील काही दिवसांपासून पूर्ण क्षमतेने झाले आहेत.

चिकलठाणा व पडेगाव येथे प्रत्येकी 150 टन कचर्‍यावर रोज प्रक्रिया केली जात आहे. मात्र याठिकाणी कचर्‍यातून बाहेर पडणार्‍या लिचेडचा प्रश्न चिंतेचा विषय ठरला आहे. या दोन्ही प्रकल्पात लिचेडसाठी लाखो लीटर क्षमतेचे टँक तयार केले आहेत. मात्र पावसाळ्यात हे टँक ओव्हरफ्लो होताना दिसत आहे. चिकलठाणा येथील प्रकल्पातून लिचेड थेट शेतकर्‍यांच्या शेतात जात असल्याने दोनवेळा आंदोलने झाली. त्याची दखल घेत प्रशासनाने आता पावले उचलली आहेत.

यासंदर्भात भोंबे यांनी सांगितले की, लिचेड कमी करण्यासाठी तीन पर्याय समोर आले होते. त्यात शेड टाकणे, लिचेट टँकचे आऊटलेट ड्रेनेजलाइनमध्ये सोडणे किंवा केमिकलच्या मदतीने प्रक्रिया करणे, या तीन पर्यांयावर अभ्यास करण्यात आला. त्यात केमिकलच्या मदतीने प्रक्रिया करण्याचा पर्याय योग्य असल्याचे समोर आले. त्यानुसार प्रस्ताव तयार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या