नायलॉनचा मांजा विकल्यास हाेणार 'जेल'

कडक अंमलबजावणी सुरू
नायलॉनचा मांजा विकल्यास हाेणार 'जेल'

औरंगाबाद - aurangabad

पतंग (Kite) उडवताना चिनी आणि (Nylon) नायलॉन मांजाचा वापर करण्यांना थेट तुरुंगवास होऊ शकतो. असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नायलॉन मांजाचा वापर पक्षी, प्राणी आणि नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरु शकतो. म्हणूनच राज्य सरकारने या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु, तरही छुप्या पद्धतीने याची विक्री, वापर आणि साठवणूक केली जाते. यामुळे बंदीचे उल्लंघन करुन अशा प्रकारच्या मांजाचा वापर करण्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.

पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नायलॉन दोरा, दोऱ्याची निर्मिती, विक्री आणि वापरावर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण जिल्ह्याच्या परिसरात एक जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडधिकारी शशिकांत हदगल यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि वन्य पशू-पक्ष्यांचे जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च कलम १४४ (१) (२) नुसार हा आदेश काढण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.

नायलॉन मांज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून या नायलॉन मांज्यावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री सुरू आहे. दरम्यान, नायलॉन मांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या संदीप दिलीप टाक (वय २५, रा. शिवशंकर कॉलनी, जवाहर कॉलनी) याला जिन्सी पोलिसांनी पकडले. ही कारवाई २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता जिन्सी चौक ते रेंगटीपुरा या रस्त्यावर करण्यात आली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन हजार ८०० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला.

राज्य सरकारने १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही अशा मांजाची विक्री आणि वापर केला जातो. अशांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. नायलॉन किंवा चिनी मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा गुन्हा जामीनपात्र असला तरी यासाठी एक महिना तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

Related Stories

No stories found.