Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादची पायलट प्रकल्पासाठी निवड

औरंगाबादची पायलट प्रकल्पासाठी निवड

औरंगाबाद – aurangabad

प्रशिक्षण संस्थाच्या (Training institute) एकत्रिकरणातून विविध प्रशिक्षण उपक्रम एकाच छताखाली आणण्याच्या शासनाचा पायलट प्रकल्प (Government pilot project) औरंगाबाद जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना तांत्रिक, कौशल्य, प्रशासकीय प्रशिक्षण त्याचप्रमाणे व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण सुविधा, बहुकौशल्य असणारे मानव संसाधन शासकीय कामाकाजासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी जिल्ह्यातील शासकीय प्रशिक्षण संस्था प्रमुखांच्या बैठकीत सांगितले.

- Advertisement -

या बैठकीस मराठवाडा महसूल प्रबोधिनी, पैठण (Paithan) येथील प्रशिक्षण संस्थाचे संचालक ,संदीप काळे तथा समिती सदस्य, यांच्यासह वाल्मी, डायट, महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्र, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था यांच्यासह सर्व शासकीय प्रशिक्षण संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शासकीय सेवा सुविधा नागरिकांना देत असताना प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून जलद व गुणवत्तापूर्ण कामकाज होते. या प्रशिक्षण संस्थांना एकात्रित गुणवत्ता ,सुधार व वेगवेगळ्या प्रशिक्षणाचे नियोजन, वेळापत्रक, उपलब्ध साधन सामुग्री, साधन व्यक्ती व प्रशिक्षकाच्या समन्वयातून बहुकौशल्य आत्मसात करण्याकरिताचे नियोजन जिल्हा प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून करण्याचा पायलट प्रकल्प औरंगाबाद येथे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय सामिती गठीत करण्यात आली आहे. या संदर्भात प्राथमिक माहितीचे संकलन व उपलब्ध साधनसामग्रीची माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशिक्षण संस्थाच्या प्रमुखांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या