Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसंत गजानन महाराज प्रकटदिन ; आज आहे विशेष महत्व

संत गजानन महाराज प्रकटदिन ; आज आहे विशेष महत्व

शेगाव – प्रतिनिधी – Shegaon

आज दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यासह संपूर्ण भारतात श्रीच्या भाविकाकडून श्री संत गजानन महाराज (Sant Gajanan Maharaj) यांच्या १४४ वा प्रगटदिन उत्सव साजरा केला जात आहे. श्रीं संत गजानन महाराज प्रगटदिनोत्सव धार्मिक प्रथा-परंपरेनुसार दरवर्षी विविध कार्यक्रमासह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट आणी (corona) कोवीड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता यावर्षीचा ‘श्रींच्या प्रगटदिनोत्सव (१४४ वा) दि.१७ ते २३ फेब्रुवारी २०२२ पावेतो श्री संस्थानच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.

श्री संत गजानन महाराजांच्या या वर्षीच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे “श्रीं”च्या प्रकटदिनाची तारीख व तिथी ही एकाच दिवशी आली आहे. अभ्यासकांच्या मते असा हा योगायोग काही वर्षांनंतर जुळून आला आहे. ज्या दिवशी श्री गजानन महाराज प्रकट झाले. तो दिवस शनिवार होता. यावेळी तिथी व तारीख एक असली तरी दिवस मात्र बुधवार आहे. माघ वद्य सप्तमी शके १८०० दि.२३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज प्रकट झाले. काही वर्षानंतर यावर्षी तिथी व तारीख एकच आली आहे. त्यामुळे या प्रकटदिनाला भक्तांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत (E-Darshan Pass) ई-दर्शन पासद्वारे भाविकांसाठी श्री दर्शन सुविधा उपलब्ध असून अनुषंगीक निवास व भोजनप्रसाद (Bhojan Prasad) व्यवस्था करण्यात आलेली आहे. ह्या व्यवस्था प्रगटदिनोत्सव काळातही आहेत तशाच नियमानुसार उपलब्ध राहतील. असे आवाहन श्री संस्थानकडून (Mandir Sansthan) करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या